स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूला साथ देणारी असल्याने अश्र्विन आज खेळू शकतो : भारतीय क्रिकेट 🏏 प्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी.

पुणे दिनांक १९ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सर्व भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी साठी मोठी आनंदाची बातमी असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहमदा बाद येथे आज वातावरण अतिशय चांगले आहे.पावसाची शक्यता नाही.आज दुपारी २ ते सांयंकाळी ५ वाजेपर्यंत अहमदाबाद येथे ३२.सी.ते ३३.सी.दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.यामुळे सर्व भारतीय क्रिकेट 🏏 प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.व भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना हा पाऊसाचा विनाअडथळा पाहता येणार आहे.
दरम्यान आज दुसरी एक आनंदाची बातमी असून बलाढ्या ऑस्ट्रेलियाला रोखण्यासाठी आज फायनल मध्ये अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्र्विनला कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड हे दोघेजण खेळवण्याची योजना आखत आहेत.त्याचे कारण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजी साठी अनुकूल आहे.असल्यामुळे आजच्या सामन्यात एक बदल होऊ शकतो.व तशी दाट शक्यता आहे.सध्या फिरकीपटू म्हणून रविंद्र जडेजा व कुलदीप यादव यांनी आतापर्यंत दहा सामन्यात चांगली धुरा सांभाळली असून त्यांच्या जोडीला अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्र्विन देखील साथ देण्याची शक्यता आहे.त्या मुळे टीम इंडियाची ताकद वाढणार आहे.आजचा सामना पाहण्यासाठी मोठे उद्योगपती.राजकीय नेते कलाकार .तसेच असंख्य भारतीय क्रिकेट 🏏 प्रेमी हे उपस्थित राहणार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.