१९ ला ठरणार चॅम्पियन कोण. : वर्ल्ड कपचा फायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना १९ नोव्हेंबर रोजी गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर

पुणे दिनांक १६ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला व फायनल मध्ये धडक मारली आहे.दरम्यान दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया पुढे २१३ धावांचे आव्हान ठेवले होते.दरम्यान ऑस्ट्रेलियाने तीन गडी राखून हे आव्हान पार केले आहे.व फायनल मध्ये प्रवेश केला आहे.आता भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलियाचा सामाना हा १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
दरम्यान आता १९ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात विश्र्वचषकाचा अंतिम सामना होईल हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी दोन वाजता सुरू होईल दरम्यान भारताने न्यूझीलंड संघाचा पराभव करत सलग दहा सामना जिंकून भारतीय संघ अधीच फायनल मध्ये पोहोचला आहे व भारतीय क्रिकेट संघ हा अहमदाबाद येथे दाखल झाला आहे. आज ईडन गार्डन वरील आज झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका चा पराभव करून फायनल मध्ये पोहोचला आहे.आता ऑस्ट्रेलिया संघ हा भारता बरोबर फायनल मध्ये खेळण्यासाठी अहमदाबाद येथे पोहोचेल.दोन्ही संघ तगडे असून आता फायनल मध्ये कोण चॅम्पियन होणार हे आता १९ नोव्हेंबरला समजेल.या सामन्यांवर आता संपूर्ण भारतीय क्रिकेट प्रेमीचे लक्ष लागले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.