टीम इंडियात कोणतेही बदल नाही : भारताने नाणेफेक जिंकली थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात

पुणे दिनांक १५ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत विरुद्ध न्यूझीलंड आज मुंबई मधील वानखेडे स्टेडियमवर सेमी फायनल मॅच होत असून यात भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.आता प्रर्यत झालेले सर्व सामने भारतीय क्रिकेट संघाने जिंकले आहेत.भारतीय संघाच्या वतीने संघात कोणतेही बदल केलेले नाहीत.दरम्यान थोड्याच कालावधीत सामना सुरू व्होईल . यापूर्वी झालेल्या सामन्यात २०१९ मध्ये न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा पराभव केला होता.सध्या भारतीय क्रिकेट संघात ७ते ८ खेळाडू जबरदस्त फॉर्मात असून ते आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सेमी फायनल मॅच मध्ये न्यूझीलंड संघाचा पराभव करून बदला घेतील असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचे चाहते मोठ्या प्रमाणावर विश्र्वास व्यक्त करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.