MLA Rohit Pawar elected unopposed : आजोबा नंतर नातवाची ही किक्रेटच्या मैदानात बॅटिंग.

आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर असोशिएशनच्या सदस्यपदाची निवडणूक पार पडली. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान, असोशिएशनच्या निवडणुकीत शरद पवारांचे नातू रोहित पवार हे क्लब गटाकडून विजयी झाले होते. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली होती. त्यानंतर असोशिएशनच्या कमिटीची बैठक आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडली. त्यावेळी त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आता महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनमध्ये रोहित पवारांची एंट्री झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Pune News, MLA Rohit Pawar elected unopposed News, Pune Sports News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.