Neeraj Chopra : नीरज चोप्राची गगनभरारी कामगिरी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा पहिलाच भारतीय

पुणे दिनांक २८ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) हंगरीची राजधानी बुडापेस्ट वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा ' गोल्डन बाॅय ' अशी ओळख असलेल्या भालाफेकपटू नीरज चोप्रा यांने भारत देशाचे नाव उंचावले आहे.नीरज गोल्डन मेडल जिंकेल असा विश्वास होता.आणि तो त्यांने सार्थ ठरवत फायनल मध्ये पाकिस्तानच्या अशरफ नदीम याचा खुर्दा उडवला आहे.व नीरजने गोल्ड मेडल जिंकून गगनभरारी घेत ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे.
नीरज हा वर्ल्ड अॅथलएटइक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक 🏅 मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.नीरजने दुसऱ्याच प्रयत्नात ८८.१७ मीटर लांब भाला फेकला व अव्वल स्थान पटकावलं.नीरज यासह एकाच वेळी ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकणारा जगातील दुसराच भालाफेकपटू ठरला आहे.तसेच पाकिस्तानच्या अशरफ नदीम याला दुसरा क्रमांक मिळाला व त्याला सिल्व्हर मेडल कमाई केली.
नीरजने२०१६ लाख ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली होती.नीरज त्यावेळी अॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला होता.आणि तब्बल आता ७ वर्षांनी नीरजने पून्हा गगनभरारी घेत इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.