Pimpri Chinchwad : आंतरशालेय स्पर्धा 2022 चा पिंपरी चिंचवड हॉकी निकाल

पिंपरी चिंचवड महानगरपालिका , जिल्हा क्रीडा परिषद पुणे व एस एन बीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तर शालेय हॉकी स्पर्धा दिनांक ०१/१२ /२०२२ रोजी मेजर ध्यानचंद पॉलीग्रास हॉकी मैदान, नेहरूनगर येथे संपन्न झाली .सदर स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्रीमती श्वेता पैठणकर मुख्याध्यापिका एस एन बी पी स्कूल, मोरवाडी यांनी केले ,श्री फिरोज शेख- संचालक एस ए सोसायटी, श्री अनिल जगताप हॉकी स्पर्धा प्रमुख यांच्या हस्ते झाले .सदर स्पर्धा १४,१७,१९ या वयोगटात मुले / मुलींच्या होणार आहेत.
दिनांक ०१/१२/२०२२ रोजी १४ व १७ या वयोगटाच्या मुलांच्या स्पर्धा झाल्या . त्यांचानिकाल पुढीलप्रमाणे
१४ वर्षाखालील मुले वयोगटाचा निकाल -
प्रथम क्रमांक: एस एन बी पी स्कूल मोरवाडी (१७०७ ) : स्कोर १-० (अठराव्या मिनिटाला आर्यन गायकवाड याने एक गोल केला)
द्वितीय क्रमांक: एस एन बी पी स्कूल चिखली
तृतीय क्रमांक: सेंट ज्यूड हायस्कूल देहूरोड
१७ वर्षाखालील मुले वयोगटाचा निकाल -
प्रथम क्रमांक: एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल मोरवाडी(१७०७): स्कोर १-० (२७ व्या मिनिटाला अंकुल गोकुळ याने एक गोल केला)
द्वितीय क्रमांक: सेंट उर्सुला हायस्कूल आकुर्डी
तृतीय क्रमांक: सेंट ज्यूड हायस्कूल देहूरोड
१९ वर्षाखालील मुले वयोगटाचा निकाल - दि. ०२/१२ /२०२२
प्रथम क्रमांक: एस एम बी पी इंटरनॅशनल स्कूल ,मोरवाडी: ४:० २८ व्या व ३५ व्या मिनिटाला अमन शहा यांनी दोन गोल केले ३३ व्या व ५१ व्या मिनिटाला आकाश शिंग याने दोन गोल केले
अमन शहा - २ गोल (28 व्या मि. व ३५व्या मि.)
आकाश सिंग - २ गोल (33 व्या मि.51व्या मि.)
द्वितीय क्रमांक: जय हिंद हायस्कूल पिंपरी
तृतीय क्रमांक: एस एन बी पी स्कूल अँड कॉलेज,मोरवाडी
१४ वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक: एस एन बी पी स्कूल मोरवाडी - स्कोर १-० १३ व्या मिनिटाला नंदिनी निंबाळकर हिने गोल केला
द्वितीय क्रमांक: द न्यूमिलियम स्कूल सांगवी
तृतीय क्रमांक: सेंट जुड स्कूल देहूरोड
१७ वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक: सेंट ज्यूड स्कूल स्कोर - १-० ३७ व्या मिनिटाला संतोषी चौधरी हिने गोल केला
द्वितीय क्रमांक: एस एन व्ही पी स्कूल मोरवाडी
तृतीय क्रमांक: एस एन बी पी स्कूल अँड कॉलेज मोरवाडी
१९ वर्षाखालील मुली
प्रथम क्रमांक: एस एन बी पी स्कूल मोरवाडी - स्कोर ५-० ३ ऱ्या ,४० व्या ,५०व्या मिनिटाला फिरदोस सय्यद हिने तीन गोल केले व ज्ञानेश्वरीने १४ व्या ,१८ व्या मिनिटाला दोन गोल केले
द्वितीय क्रमांक: द न्यूमिलेनियम
तृतीय क्रमांक: एस एन बी पी स्कूल अँड कॉलेज, मोरवाडी
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.