Pune city police cricket team : पुणे शहर पोलीसांच्या क्रिकेट टिमचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार

पुणे जिल्हा क्रिकेट असोशियन आयोजित स्व.सदु शिंदे क्रिकेट लीग या मानाच्या स्पर्धेत सलग दुसया वर्षी पुणे शहर पोलीस दल अंतिम सामन्यात मजल मारुन उपविजेता ठरला, या कामगिरीसाठी मा.पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता यांनी सर्व खेळाडुंचा विशेष सन्मान केला. यावेळी पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक व सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते.
सदर स्पर्धेमध्ये एकुण 42 संघांनी सहभाग नोंदवला होता अभिमानाची गोष्ट ही आहे की सदर स्पर्धेत मा.पोलीस आयुक्त सरांनी स्वत: सहभाग घेवुन खेळाडंुचा उत्साह व्दिगुणित केला.कायदा व सुव्यवस्था तसेच नियमित कामकाज पाहुनही खेळाडुंनी मिळविलेल्या यशाबद्दल पोलीस आयुक्त यांनी विशेष कौतुक केले.
स्पर्धेमध्ये पोलीस निरीक्षक उल्हास कदम तसेच सपोनि नंदकुमार कदम, वि·ाजित तारु,शिवाजी दबडे, आरिफ शेख, विपुन गायकवाड, अमित बोडरे, अमरनाथ लोणकर, प्रशांत गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड, तेजस भोसले, अंकुश दिघे, महेश राठोड, अमोल पायगुडे, अमर साळवे, रविंद्र गोलाने, स्वप्नील कांबळे, आ·िान कुमकर, अ·ाजित सोनवणे, अजिंक्य गायकवाड, निलेश कुलथे यांनी सहभाग नोंदविला.
या कामगिरीसाठी मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता यांनी खेळाडुंचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.