टीम इंडियाच्या विजयासाठी कोट्यवधी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात : टीम इंडियाच्या विजयासाठी गणपती बाप्पाला साकडं.मनसेच्या वतीने दगडूशेठ मंदिरात व काॅग्रेसच्या वतीने कसबा गणपती महापूजा

पुणे दिनांक १८ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मागील महिन्यापासून भारतात विश्र्वचषकाचा मोठा थरार पहाण्यास मिळत असून यात भारतीय क्रिकेट संघाचे सलग दहा सामने जिंकून फायनल मध्ये पोहोचला आहे. दरम्यान आता फायनलचा सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात १९ नोव्हेंबर रोजी दुपारी होणार आहे.दरम्यान टीम इंडियांने हा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघा बरोबर टीम इंडिया विजयी व्हावा यासाठी कोट्यवधी भारतीयांनी देव आजच पाण्यात ठेवले आहेत.पुण्यात मनसेच्या वतीने दगडूशेठ गणपतीला होम हवन केले तर काॅग्रेस पक्षांच्या वतीने ग्रामदैवत कसबा गणपतीची महापूजा केली आहे.
दरम्यान संपूर्ण विश्र्वचषकात आतापर्यंत टीम इंडियाची कामगिरी अजिंक्य अशीच राहिली आहे.व टीम इंडिया फायनल मध्ये पोहोचला आहे.उद्या आता अंतिम फायनल सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे.विश्र्वचषकाची ट्राॅफी उंचवण्यापासून भारतीय संघ आता फक्त एक पाऊल दूर आहे.यासाठी देशभरातून क्रिकेट चाहत्यांचे टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना व होम हवन सुरु झाले आहेत.आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेकडो कार्यकर्ते हे दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिरात जमले होते.व यावेळी त्यांनी भारत संघ विजयी व्हावा यासाठी होम हवन करण्यात येऊन गणपती बाप्पाला साकडं घालण्यात आले.तर काॅग्रेस पक्षांच्या वतीने पुण्याचे ग्रामदैवत व पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीची महापूजा करण्यात आली आहे.यावेळी भारतीय संघाच्या विजायासाठी यावेळी आरती करण्यात आली आहे.यावेळी हजारो कार्यकर्ते यांनी टीम इंडियाची जर्सी घातली होती.यावेळी इंडिया जीतेगा म्हणत काॅग्रेस कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.