श्रीलंकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिकाकडे जाणार : श्रीलंका क्रिकेट 🏏 बोर्डाला आयसीसीकडून दुसरा धक्का,अंडर१९ विश्र्वचषकच्या यजमान पदावरुन हकालपट्टी

पुणे दिनांक २१ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) श्रीलंकेच्या क्रिकेट 🏏 नियामक मंडळाला सध्या एकापाठोपाठ एक झटके बसायला लागले आहेत.दरम्यान श्रीलंकेच्या संघाला विश्र्वचषकातील स्पर्धात विषेश कामगिरी न दाखविल्यामुळे बाहेर पडावं लागलं आता पून्हा भरीत भर पडली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आता श्रीलंकेकडून अंडर १९ विश्र्वचषकचे यजमानपद काढून घेण्यात आले आहे.
दरम्यान याप्रकरणी श्रीलंका क्रिकेट नियामक मंडळात सध्या सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे आयसीसीने एका प्रदिीर्घ बैठकीनंतर ही धुरा आता दक्षिण आफ्रिकेवर सोपविण्यात येणार आहे. दरम्यान १९ वर्षांखालील विश्र्वचषक हा पुढील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये होणार आहे.तत्पूर्वी श्रीलंकेच्या क्रीडा मंत्री यांनी २०२३ च्या विश्र्वचषकातील वाईट खेळी मुळे संपूर्ण नियामक मंडळाला बरखास्त केलं होतं आयसीसीने हा सरकारी हस्तक्षेप मानला आणि श्रीलंका मंडाळाचे निलंबन केले होतं .आता आयसीसीकडून श्रीलंकेला लागोपाठोपाठ दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.