१९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेशा बरोबर सामना : विजयी चौकार मारण्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल.पुण्यात विमानतळावर जल्लोषात स्वागत

पुणे दिनांक १५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तान संघाच्या विश्र्वचषक वर्ल्ड कप सामन्यात सलग आठव्यांदा पाकिस्तानच्या चारीमुंड्या चित केल्यानंतर टीम इंडिया पुढील सामना खेळण्यासाठी पुण्यात दाखल झाला आहे.
दरम्यान आज अहमदाबाद येथे पाकिस्तान बरोबर सामना झाल्या नंतर इंडियाचा क्रिकेट संघ हा पुण्यातील विमानतळावर दाखल झाला आहे.यावेळी पुणेकर नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत व बांगलादेश यांच्यात दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सामना खेळला जाणार आहे.बऱ्याच वर्षांपासून पुण्यातील स्टेडियमवर सामना झाला नव्हता त्यामुळे पुण्यातील सामान्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.भारत व बांगलादेश यांच्यातील सामना हा दुपारी खेळवला जाणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.