WORLD CUP -भारताचा आज पहिला सामना : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप मधील पहिला सामना चेन्नईत दुपारी दोन वाजता हाय व्होल्टेज लढत

पुणे दिनांक ८ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय संघाचा विश्र्वचषक मधील आजचा पहिला सामना असून सदरचा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर दुपारी दोन वाजता होणार आहे.दरम्यान भारतीय संघाला विश्र्वचषकातील मोहिमेची सुरुवात विजयाने करायाची आहे.टिम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा कडे असणार आहे.तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व हे पॅट कमिन्स यांच्या कडे असणार आहे.
दरम्यान आज भारतीय संघ हा आयसीसी क्रिकेट 🏏 विश्र्वचषक सन २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामान्याने आपल्या मोहीम सुरूवात करणार आहे.व आज रविवार असून आज अनेक क्रिकेट असंख्य प्रेमी या सामन्याचा आनंद घेणार आहे.भारतीय वेळेनुसार आजचा सामना दुपारी दोन वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम वर सुरू होणार आहे.दरम्यान या स्टेडियमची खेळपट्टी ही संतूलित खेळपट्टी साठी ओळखली जाते.यात फलंदाज व गोलंदाज या दोघांन साठी चांगली आहे.बघूया आज गोलंदाज या फलंदाज या खेळपट्टीचा काय लुप्त उठवतात दोन्ही संघान पैकी कोणीही नाणेफेक जिंकली तरी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतील दरम्यान आजतागायत भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने या स्टेडियमवर एकूण २२ एकदिवसीय सामने खेळले असून यात ७ सामने जिंकले आहेत.तर दरम्यान सन २०१४ मध्ये एका पराभावा चा समावेश आहे.
दरम्यान आज होणाऱ्या हायव्होलटेज सामन्यात दोन्ही संघ असे आहेत . भारतीय संघ १) रोहित शर्मा ( कर्णधार) २) इशान किशन ३) विराट कोहली.४) श्रेयस अय्यर ५) केएल राहुल.६) हार्दिक पंड्या ७) रविंद्र जडेजा ८) रविचंद्रन अश्र्विन ९) कुलदीप यादव १०) जसप्रीत बुमराह ११) मोहम्मद सिराज .१२) मोहम्मद शमी १३) सूर्यकुमार यादव १४) शुबमन गिल.१५) शार्दुल ठाकूर असे असून यातून ११ जणांची निवड केली जाईल
ऑस्ट्रेलिया संघ १) पॅट कमिन्स ( कर्णधार) २) स्टीव्ह स्मिथ.३) अॅलेक्स कॅरी ४) जोश इंग्लिश.५) शाॅन अॅबाॅट ६) कॅमेराॅन ग्रीन ७) जोश हेझलवूड ८) मिचेल मार्श ९) ग्लेन मॅक्सवेल १०) मान॔स लॅबुशेन ११) मार्कस स्टाॅइनिस१२) डेव्हिड वॉर्नर १३) ट्रॅव्हिस हेड १४) अॅडम झाम्पा १५) मिचेल स्टार्क.दरमयान यातून ११ खेळाडू ची निवड केली जाईल.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.