बदलापूर ते वांगणी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली दुरुस्तीचे काम सुरू : मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळित, ओव्हरहेड वायर तुटली लोकल सेवा झाली ठप्प

पुणे दिनांक २९ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेची वाहतूक व्यवस्था तांत्रिक बिघाडामुळे मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.कर्जत ते बदलापूर दरम्यान धावणारी लोकलसेवा सकाळी सकाळी खोळंबली आहे.बदलापूर ते वांगणी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळित झालेली आहे.
दरम्यान याप्रकरणी रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कर्जत ते बदलापूर व वांगणी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हा तांत्रिक बिघाडामुळे या रुटवरील रेल्वेची सेवा विस्कळित झाली आहे.दरम्यान या प्रकरणी रेल्वे कर्मचारी हे ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.लवकरच हे काम पूर्ण होऊन लोकलसेवा पूर्ववत होईल असे सांगण्यात आले आहे.पण यामुळे लोकलसेवावर परिणाम होऊन टाईम टेबल बिघडले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.