वंदेभारत ट्रेन पुणे ते सिंकदराबाद धावणार होणार सुपरफास्ट प्रवास : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी रेल्वे प्रवाशांसाठी पुणे जंक्शनवरुन सुटणार वंदेभारत ट्रेन

पुणे दिनांक १५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत देशात वंदेभारत एक्सप्रेस सर्वात लोकप्रिय झाली आहे.व अति वेगवान एक्स्प्रेसला सेमी हायस्पीड ट्रेन म्हटले जात आहे.या रेल्वे ट्रेनने आता भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे.आता यामुळे अनेक राज्यांनी वंदेभारत ट्रेन आपल्या राज्यांतून सुरू व्हावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत एकूण चार वंदेभारत ट्रेन धावत आहेत.आता दिवाळी पासून आणखी एका वंदेभारत ट्रेन धावणार आहे.पुणे जंक्शन वरुन वंदेभारत ट्रेन सुरु होणार आहे.एक प्रकारे पुणेकरांना दिवाळीची भेट रेल्वे मंत्रालया कडून मिळणार आहे.
दरम्यान ( मेक इन इंडिया) च्या मोहिमेत अंतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदेभारत ट्रेन राज्यात प्रथम गांधीनगर ते मुंबई अशी धावली आहे.त्यानंतर मुंबई ते गोवा.मुंबई ते साईनगर. व मुंबई ते सोलापूर दरम्यान वंदेभारत ट्रेन पुण्यावरून जाते.परंतू अद्याप पुणे येथून सुटणारी एकही वंदेभारत ट्रेन नाही.आता पुणे जंक्शन वरुन पुणे ते सिंकदराबाद अशी वंदेभारत ट्रेन धावणार आहे.संपूर्ण देशात एकूण नऊ वंदेभारत ट्रेन सुरु होणार असून त्यात पुणे ते सिंकदराबाद वंदेभारत ट्रेनचा समावेश आहे.दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर एकूण नऊ वंदेभारत ट्रेन सुरु होणार असून त्यापैकी तीन रेल्वे ट्रेन मध्यरेल्वे विभागात सुरू होणार आहे.यात जालना ते मुंबई मुंबई ते कोल्हापूर.व पुणे ते सिंकदराबाद अशा वंदेभारत ट्रेन एकंदरीत असणार आहेत.दरम्यान आतापर्यंत भारतीय रेल्वेच्या एकूण ३४ वंदेभारत रेल्वे ट्रेन संपूर्ण देशभरात धावत असून या ट्रेन ची संख्या थोड्याच कालावधीत अजून एकूण २०० वंदेभारत ट्रेनचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे.स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जातीने लक्ष या हायस्पीड ट्रेनकडे आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.