E ticket through whatsapp : मेट्रोमध्ये तुम्ही WhatsApp माध्यमातून e-Ticket खरेदी करू शकता

गेल्या काही महिन्यांतील अनेक चाचण्यांनंतर, हैदराबाद मेट्रो रेल्वेने BilliC आणि AFC भागीदार, ShellInfo Globals, सिंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, WhatsApp द्वारे डिजिटल तिकीट बुक करण्याचा एक नवीन मार्ग सुरू केला आहे. याच्या मदतीने हैदराबाद मेट्रो रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी दैनंदिन प्रवास अधिक सुकर होणार आहे. प्रवासी आता त्यांच्या स्वत:च्या WhatsApp नंबरवर ई-तिकीट खरेदी करू शकतात.
WhatsApp द्वारे तिकीट कसे बुक करावे
1) हैद्राबाद मेट्रो रेल्वे फोन नंबर +918341146468 वर 'हाय' पाठवून WhatsApp चॅट सुरू करा किंवा मेट्रो स्टेशनवर उपलब्ध QR कोड स्कॅन करा.
2) आता तुम्हाला एक OTP आणि एक ई-तिकीट बुकिंग URL मिळेल, जो 5 मिनिटांसाठी वैध असेल
3) ई-तिकीट गेटवे वेबपेज उघडण्यासाठी ई-तिकीट बुकिंग URL वर क्लिक करा
4) आता तुम्हाला कुठे जायचे आहे आणि कुठून जायचे आहे ते निवडा आणि पेमेंट करा. तुम्ही Gpay, PhonePe, Paytm आणि Rupay डेबिट कार्डने पेमेंट करू शकता
5) तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत व्हॉट्सअॅप नंबरवर मेट्रो ई-तिकीट URL मिळेल
6) QR ई-तिकीट डाउनलोड करण्यासाठी मेट्रो ई-तिकीट URL वर क्लिक करा
7) AFC गेटवर QR ई-तिकीट फ्लॅश करा आणि पुढे जा.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.