Sex Tantra : पुणे शिक्षणाचे माहेरघर सॉफ्टवेअर कंपनीचे हब " सेक्सचे धडे " या अश्शील जाहीराती वरुन नवे वांदाग

पुणे शिक्षणाचे माहेरघर व सॉफ्टवेअर कंपनीचे हब. अशा या पुण्यात आता सेक्सचे धडे या अश्शील जाहीराती वरुन नवा वाद निर्माण झाला आहे. सध्या पुण्यात सोशल मीडिया वरून फिरत असलेल्या एक अशशील जाहिरातीमुळे पुणेकरांच्या तिखट प्रतिक्रिया बघायला मिळत आहे.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुणे शहराचा नावलौकिक हा सात समुद्रा पार आहे. अनेक प्रदेशातून शिक्षणाचा नाव लौकिक असल्यामुळे विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी येतात यातच आता संपूर्ण पुणे शहरात सोशल मीडियावर फिरत असलेल्या.एका अश्शील जाहीराती मुळे पुण्यात अनेक तिखट प्रतिक्रिया आता प्रचंड प्रमाणात येत आहे." सेक्स तंत्र " या नावाने एक प्रशिक्षण शिबिर भरविण्यात येणार असून येत्या १ ते ३ ऑक्टोंबर दरम्यान हे शिबिर असणार आहे. त्यासाठी प्रति व्यक्ती.१५. हजार रुपये असे शुल्क प्रायोजकांनी ठेवले आहे.आता या अशशील जाहिरातीमुळे सोशल मीडियावर नव्या वादाला आता तोंड फुटले आहे.
दरम्यान नवरात्रो स्पेशल या नावाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरीही जाहिरात व प्रायोजक यांचा हा उपक्रम शंकास्पद आहे व बेकायदेशीर आहे. असे अनेक तज्ज्ञांचे या जाहिराती बाबत म्हणणे आहे या जाहिरातीमधून वेगळीच काहीतरी प्रतीत होत आहे.
त्यामुळे पोलिसांनी याबाबतीत तातडीने कायदेशीर कारवाई करावी असे अनेक सामाजिक कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटना व कायदे तज्ज्ञ ऍड असीम सरोदे यांनी केली आहे. तसेच पुण्यात नेमके काय चाललंय हा एक गंभीर प्रश्न त्यांनी त्यांच्या फेसबुक वरील पेजवर उपस्थित केला आहे. तर अनेक राजकीय व सामाजिक संघटना व हिंदुत्ववादी संघटना यांनी या जाहिराती बाबत प्रचंड विरोध केला असून संबंधित जाहिरात करणाऱ्या प्रायोजकावर तातडीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई करावी असे सर्व पुणेकरांचा सूर आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.