New Social Media Rules : नवे सोशल मीडिया नियम, मार्चपासून होणार लागू

फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडिया कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्याच्या तयारीला आता सुरूवात झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने तीन तक्रार अपिल समित्या (GAC) स्थापन करण्याची घोषणा केली आहे, ज्या 1 मार्च 2023 पासून कार्यरत होतील. यूजर्सच्या तक्रारी ३० दिवसांत निकाली काढण्याची जबाबदारी या समित्यांची असेल.
यूजर्सच्या तक्रारींवर तातडीने कारवाई व्हायला हवी,असे सरकारचे मत आहे.अशा परिस्थितीत सोशल मीडिया कंपन्यांना यूजर्सच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने व्हर्च्युअल डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची घोषणाही केली आहे, जे फक्त ऑनलाइन आणि डिजिटल चालेल, ज्यामध्ये वापरकर्ते ऑनलाइन तक्रारी दाखल करू शकतील.
यासोबतच या तक्रारींवर निकाल आणि निदानही ऑनलाइन करता येणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असेल. त्यांच्या तक्रारीवर काय कारवाई झाली याचा मागोवा यूजर्स ऑनलाइन घेऊ शकतील.
याशिवाय तक्रारीविरुद्ध अपील करण्याचा पर्यायही दिला जाणार आहे. तक्रारीनंतर कोणी दोषी आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. म्हणजे तक्रारीत पोस्ट काढून टाकली जाईल. अन्यथा त्या खात्यावर कारवाई केली जाईल.
सोशल मीडियावरील तक्रारींवर कारवाई करण्यासाठी तीन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात फूल टाइम चेअर परसन, दोन फूल टाइम मेंबर्स असतील. याच दुसऱ्या समितीत संयुक्त सचिव स्तरावरील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी असतील. तर तिसऱ्या पॅनेलमध्ये आयटी मंत्रालयाचे अधिकृत अध्यक्षांचा समावेश असेल.
सोशल मीडियावरील मनमानी थांबवण्यासाठी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण असे करून सरकारला सोशल मीडियावर नियंत्रण ठेवायचे आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे. मात्र मीडिया यूजर्सच्या लिमिटेशन्स निश्चित करायच्या आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.