पंतप्रधान मोदी बंगळूर मध्ये : पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळूरु मध्ये चांद्रयान -३ लॅण्ड झालेल्या जागेचे नाव ' शिवशक्ती 'अशी केली घोषणा

पुणे दिनांक २६ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसाचा दौरा आटोपून भारतात दाखल झाले आहेत.पंतप्रधान मोदी हे इस्त्रोच्या सेंटरमध्ये जाऊन शास्त्रज्ञांशी संवाद साधून त्यांना चांद्रयान -मोहिम यशस्वी झाली. त्याबद्दल त्यांना भेटून सर्व शास्त्रांज्ञ व टेक्नीिशियन व इंजिनिअर यांना व महिला शास्त्रज्ञ यांचा या मोहिमेत मोठी भूमिका बजावली आहे.असे ते म्हणाले.व यावेळी त्यांनी चांद्रयान -३ लॅण्ड झालेल्या जागेचे नाव ' शिवशक्ती ' आहे असे ते म्हणाले.
दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बंगळुरू येथे इस्त्रोच्या सेंटरमध्ये मध्ये बोलताना ते या यशस्वी चांद्रयान -३ यशस्वी झालेल्या मोहिम बदल थोडे भावनिक झाले होते.पुढे बोलताना ते म्हणाले हा भारताचा विज्ञान सामर्थ्याच्या ' शंखनाद ' देशाला अभिमान वाटावा असा क्षण आहे.' भारत आता चंद्रावर आहे ' तो एक प्रेरणादायी क्षण होता.२३ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक क्षण लक्षात राहील.संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा आहे.मी विदेशात होतो पण माझे सर्व लक्ष भारतात होते.तुमच्या सर्व परिश्रमाला अभिवादन तुमचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे.देशातील सर्व शास्त्रांज्ञांनी शक्य ते अशक्य केले आहे.मी सर्व शास्त्रज्ञ व टेक्निशियन व इंजिनिअर यांचे अभिनंदन करतो व चांद्रयान -३ मोहीम मध्ये महिलांची मोठी भूमिका बजावली आहे असे ते म्हणाले.व चांद्रयान -३ लॅण्ड झालेल्या जागेचे नाव ' शिवशक्ती ' असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले व परत या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वांना सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने पून्हा एकदा शुभेच्छा देतो असे म्हणून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व यावेळी भारत मातेची जय .व जय विज्ञान.जय अनुसंधानचा नारा दिला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.