सुतक कालावधी ४ वाजून ६ मिनिटांनी सुरू होणार ९ तासांचा सुतककाळ : आज कोजागिरी पौर्णिमेलाच चंद्र 🌒 ग्रहण वर्षातील शेवटचे आहे ग्रहण

पुणे दिनांक २८ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज संपूर्ण भारतात कोजागिरी पौर्णिमेलाच 🌒 चंद्रग्रहण असून या चंद्र 🌙 ग्रहणांचा कालावधी हा एकूण ९ तासांचा असणार आहे. तर सुतककालावधी हा संध्याकाळी ४ वाजून ६ मिनिटांनी सुरू होणार आहे.भारतात मध्यरात्रीनंतर दिल्ली.मुबई.चेन्नई.कोलकाता, बेंगळुरू.हैद्राबाद.अहमदाबाद.सूरत.जयपूर.कानपूर.लखनौ.नागपूर कोईम्बतूर.नाशिक.रायपूर.भोपाळ.जोधपूर.प्रयागराज.डेहराडून,व पटना.यासह अन्य भागात दिसेल दिनांक २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांनी चंद्रग्रहणास सुरूवात होणार आहे. नंतर पहाटे ३ वाजून ५४ मिनिटांनी चंद्र हा पृथ्वीच्या उपछायेतून बाहेर पडल्यानंतर हे चंद्रग्रहण संपेल.
दरम्यान सुतक कालावधी ४ वाजून ६ मिनिटांनी सुरू होणार आहे. ग्रहण संपल्यानंतर तो संपेल सुतक कालावधीत शुभकार्ये वर्ज्य आहेत.या कालावधीत मंदिरांचे दरवाजे हे बंद केले जातील.व कोणत्याही प्रकारची पूजा केली जाणार नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.