Twitter ban 50 thousand accounts in India : Twitter ने बॅन केले आहेत ५० हजार ट्वीटर अकाऊंट , जाणून घ्या यामागील कारण काय ?

मागच्या काही महिन्यात ट्वीटर या प्लॅटफॉर्म वर अनेक बदल दिसून येत आहेत. मुळात हे बदल मस्क यांनी ट्वीटर या प्लॅटफॉर्मवर खरेदी केल्यानंतर केले आहेत. नियमावली नुसार आत्ता कंपनीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या ट्वीटर अकाऊंट्सवर कारवाई करत आहे. यामुळे सध्या ट्वीटर ने जवळपास ५० हजार यूजर्सचे अकाऊंट बॅन केले आहे.
२५ ते २६ नोव्हेंबेर दरम्यान मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्वीटरने ४५,५८९ भारतीय यूजर्सचे अकाऊंट्स बॅन केले आहेत याचे मूळ कारण "बाल लैंगिग शोषण आणि पोऱ्नोग्राफीला प्रोत्साहन देणे, प्रचार करणे" यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीने दहशतवाद , हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या ३,०३५ अकाऊंट्सला देखील बॅन केले आहे.
४८ हजारांपेक्षा अधिक अकाऊंट्स केले बॅन
ट्वीटरने भारतात एकूण ४८,६२४ अकाऊंट्सबॅन केले आहे. नवीन आयटी नियमांतर्गत कंपनीला दरमहिन्याला रिपोर्ट सादर करावा लागतो. ट्विटरकडे या ठराविक कालावधीमध्ये एकूण ७५५ तक्रारी आल्या होत्या. यातील १२१ तक्रारींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये न्यायालयाच्या आदेशासोबतच यूजर्सकडून करण्यात आलेल्या तक्रारींचा समावेश आहे. यातील बहुतांश तक्रारी गैरवर्तवणूक, छळ, हिंसेला प्रोत्साहन देणे आणि गोपनीयतेचे उल्लंघन याबाबत होत्या.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.